भाजप सरकारने बलात्कारी नराधमांना पाठीशी घातले आहे : शोभा ओझा

टीम महाराष्ट्र देशा : सात वर्षांच्या बालिकेला मिठाई, चॉकलेट चारून भाजपचा नेता गेले दोन महिने तिच्यावर बलात्कार करीत होता. बालिकेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात मध्य प्रदेशातील अगर जिह्यात पोलिसांनी रविवारी पीडितेसोबत पकडले. त्याला अटक केली असून त्याचे नाव नारायण माळी आहे. तो पिपलोन या शहरात जनरल स्टोअर चालवतो. असे पोलिसांनी सांगितले.

तो बालिकेवर आपल्या दुकानातच बलात्कार करीत असायचा. त्याच्या विरोधात आयपीसीच्या कलम ३७६ आणि पॉस्को कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणावरून मध्य प्रदेश काँग्रेसने भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. कथुआपासून उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांमध्ये भाजप सरकारने बलात्कारी नराधमांना पाठीशी घातले आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांची खिल्ली उडवण्यातच भाजपचे मंत्री, नेत्यांचा सारा वेळ जात असतो. महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करायला त्यांच्याकडे वेळ आहेच कुठे, असेही त्या म्हणाल्या.

कॉंग्रेसचं गणित बिघडणार, मायावतींचा स्वबळाचा नारा

मोदींना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही- नानासाहेब जावळे

You might also like
Comments
Loading...