पीएनबी घोटाळा होत असताना रघुराम राजन काय करत होते?- शोभा डे

raguram rajan and shoba da pnb scam

टीम महाराष्ट्र देशा- देशभर गाजत असेलेल्या पीएनबी घोटाळ्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर चिखलफेक करत असताना आता रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी निशाना साधला आहे. पीएनबी घोटाळा होत असताना रघुराम राजन काय करत होते? असा थेट सवाल शोभा डे यांनी विचारला आहे.

हिरे व्यापारी निरव मोदीचा पी एन बी घोटाळा समोर येताच देशभरात मोठी खळबळ उडाली. सध्या देशभर पीएनबी घोटाळ्यावरून घमासान सुरु आहे. विरोधक केंद्र सरकारवर निशाना साधत आहेत.भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्वीट करून पीएनबी घोटाळा होत असताना तसेच सर्व व्यवहार होत असताना रघुराम राजन काय करत होते? असा सवाल उपस्थित करत रघुराम राजन यांना देखील या वादात ओढलं आहे.

pnb bank fraud

कसा झाला घोटाळा ?
देशविदेशात व्यापार असणाऱ्या नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँक मुंबई शाखेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याची कंपनी असणाऱ्या आर यूएस, सोलर एक्सपोर्ट्स आणि स्टेलर डायमंड्सच्या खरेदी विक्रीसाठी LOU मिळवला. LOU (लेटर ऑफ अंडरटेकिंग) म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला देण्यात येणारी टाईम गॅरंटी. म्हणजेच एखद्या बँकेने कोणत्याही व्यक्तीला अशी गॅरंटी दिली असेल आणि त्याच्या विश्वासावर दुसऱ्या बँकांनी कर्ज दिल्यास ते संबंधित व्यक्तीने परतफेड न केल्यास गॅरंटी देणाऱ्या बँकेला ते भरावे लागते. याच गॅरंटीच्या भरवशावर भारतीय बँकाच्या विदेशी शाखा असणाऱ्या AXIS बँक, इलाहाबाद बँक आणि युनियन बँक यांनी नीरव मोदीला क्रेडीट लोन दिले. हा घोटाळा समोर आल्यानंतर आता सरकारकडून सर्व बँकांना त्यांचे बॅलन्सशीट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Loading...

nirav-modi-pnb

कोण आहे नीरव मोदी
नीरव मोदी हा मुळचा बेल्जियमचा राहणारा हिरे व्यापारी. १९९९ मध्ये त्याने आपल्या कंपनीची सुरुवात केली. फोर्ब्स मासिकानुसार मोदी याची आजची सं पत्ती ११ हजार कोटींच्या आसपास आहे. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्याचा ८४ व क्रमांक लागतो. त्यांचे ज्वेलरी शोरूम लंडन, न्यूयॉर्क, लास वेगास, हवाई, सिंगापुर, बीजिंग सारख्या 16 शहरांमध्ये आहेत. भारतामध्ये दिल्ली आणि मुंबईत त्याचे बुटिक आहेत.

Loading...