सोलापुरात कलगीतुरा, पालकमंत्र्यांच्या विरोधात ‘ही’ रणरागिणी उतरणार मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. इच्छुक उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची चिंता वाढली आहे. कारण त्यांना आता पक्षातूनच शह मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात बंडाची तयारी सुरु केली आहे. बनशेट्टी यांनी सोलापूर उत्तर शहर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण ही निवडणूक त्यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवू असा इशारा बनशेट्टी यांनी दिला आहे.

तसेच भाजपने मिलिंद थोबडे यांना उमेदवारी दिली तर आपण पक्षाचे काम करणार असल्याचे शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. बनशेट्टी यांच्या या इशाऱ्यामुळे सोलापूर मधील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आता समोर आली आहे. या गटबाजीमुळे भाजपला येत्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील जेष्ठ नेते यावर कसा तोडगा काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जत-जामखेड मतदार आता राम शिंदे यांचीही चिंता वाढली आहे. कारण कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनीच पालकमंत्र्यांविरोधात बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यामुळे राम शिंदे यांना आता ही निवडणूक कठीण जाणार असल्याच चित्र आहे.