भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी घटस्फोट (Divorce) झाला आहे. यानंतर सानिया आणि शोएब यांच्यामध्ये ‘ती’ची एन्ट्री झाली होती, म्हणून या दोघांमध्ये घटस्फोट झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. याबद्दल कोणती अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी सर्वत्र या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटानंतर शोएबचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे आयशा उमर (Ayesha Omar).
आयशाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका टीव्ही शो च्या शूटिंगदरम्यान आयेशा आणि शोएब एकमेकांच्या जवळ आल्याचे बोलले जात आहे. शोएब आणि सानियाच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर यांच्या दोघांच्या अफेअरच्या चर्चेनी जोर धरला आहे. त्याचबरोबर शोएब आणि सानियामध्ये आयाशाचे नाव आल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आयशाला लोक वाईट बोलू लागले आहेत. तर अनेक चाहत्यांकडून तिच्यावर शोएब-सानियाचे लग्न उध्वस्त केल्याचा आरोपही केला जात आहे. अशा परिस्थितीत एका चाहत्याने आयशाला विचारले की, “तू शोएब मलिकसोबत लग्नाचा विचार करत आहे का?”
या प्रश्नाचे उत्तर देत आयाशा म्हणाली की,”ती आणि शोएब फक्त चांगले मित्र आणि शुभचिंतक आहोत. आयशाने तिच्या पोस्टमध्ये शोएबसोबत लग्न केल्याच्या प्रश्नावर उत्तर दिले की, नाही, मी शोएब लग्न करणार नाही. कारण तो विवाहित आहे आणि आपल्या पत्नीसोबत आनंदित आहे. त्याचबरोबर मी त्या दोघांचा खूप आदर करते.”
आयशा उमर या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘लव मे गम’ आणि ‘मे हू शाहिद आफ्रिदी’ या आयटम नंबरद्वारे आपली छाप पडली आहे. त्याचबरोबर तिने अनेक टीव्ही शो मध्ये देखील काम केलेले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Bommai | सीमा प्रश्नावरील सुनावणीवर बसवराज बोम्मईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमची बाजू संवैधानिक आणि…”
- Bad Breath | तोंड उघडताच येते दुर्गंधी?, तर करा ‘हे’ सोपे उपाय
- Sanjay Raut | बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान – संजय राऊत
- Udayanraje Bhosale | “राज्यपालांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा”; उदयनराजे भोसले यांची सडकून टीका
- One Day International | ODI क्रिकेट संपणार?, FICA ने जाहीर केला रिपोर्ट