कराची कसोटी अनिर्णित झाल्यानंतर शोएब अख्तर PCB वर संतापला, म्हणाला- ‘पीच पाहून झोप येते’

मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कराची कसोटी सामन्यावर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला होता. ज्यानंतर पीसीसीबीवर मोठी टीका झाली होती. आता दुसरा सामनाही ड्रॉ झाला आहे. यावर क्रिकेटरसिकही संतापलेले दिसले.

शोएब अख्तरने  (shoaib akhtar) त्याच्या यूट्यूब चॅनलद्वारे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला फटकारले आहे. तो म्हणाला, ‘तुम्ही एवढी थकलेली पीच बनवली की बघून कोणीही झोपी जाईल. इतका ऐतिहासिक दौरा होता. मग अशी पीच बनवून काय सिद्ध करायचे होते? तुमच्याकडे शाहीन आफ्रिदीसारखे वेगवान गोलंदाज आहे, मग तुमचे काय विचार आहेत. माझ्या वेळेलाही असे व्हायचे.’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पाकिस्तानमध्ये दीर्घ कालावधीनंतर आगमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तानात आला आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटप्रेमींना या मालिकेत रोमांचक क्रिकेट पाहायला हवे होते. पण, आत्तापर्यंत या मालिकेतील २ कसोटी सामने रावळपिंडी आणि कराचीमध्ये खेळले गेले आहेत. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी उपलब्ध झाल्यामुळे सामन्याची गंमत संपली. याबाबत शोएब अख्तर म्हणतो की, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी फलंदाजीसाठी कोणतीही सोपी खेळपट्टी तयार करू नये.

महत्वाच्या बातम्या