‘पाकिस्तानच्या सैन्यासाठी गुरांचा चाराही खावा लागला तरी चालेल’

shoaib akhtar

कराची- पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानं पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाकिस्तानच्या सैन्याचं आर्थिक पाठबळ वाढवण्यासाठी आपण गुरांचा चारा,गवतही खाण्यास तयार असल्याचं तो म्हणाला.

‘जर मला परमेश्वराने अधिकार दिले तर मी आर्थिक बजेटमध्ये पाकिस्तानी सैन्यासाठी जास्त पैशांची तरतूद करेन. त्यासाठी मला गुरांचा चारा खावा लागला तरी चालेल’, असं शोएब अख्तर म्हणाला.

शोएब एवढ्यावरच थांबला नाही. ‘मी आर्मी चीफला माझ्यासोबत बसवून निर्णय घ्यायला सांगेन. जर पाकिस्तानी सैन्यासाठी आर्थिक बजेट 20 टक्के तरतूद असेल तर मी 60 टक्के करेन. जर आपण एकमेकांचा आदर करणार नाही तर आपलंच नुकसान आहे’, असं देखील तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

… म्हणून होतेय एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी

मोठी बातमी: इंदुरीकर महाराजांची आज कोर्टात महत्वाची सुनावणी

महावितरणचा प्रताप : एकनाथ खडसेंना पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं वीज बिल

आयपीएस विनय तिवारी क्वारंटाइनमुक्त,आजच बिहारला जाणार परत