fbpx

जडेजा व धोनी यांच्या खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच : शोएब अख्तर

टीम महाराष्ट्र देशा- आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सेमीफायनल जिंकण्याच्या आशा जिवंत केल्या खऱ्या, पण जडेजानंतर अत्यंत महत्त्वाच्या क्षणी धोनी रन आउट झाला आणि टीम इंडियाही वर्ल्डकपमधून आउट झाली. भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव झाला. २४० धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघ केवळ २२१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

या पराभवानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याची देखील प्रतिक्रिया आली आहे शोएब म्हणाला,”भारतीय फलंदाजांनी निराश केलं. अंतिम फेरीत जाण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षित खेळ झाला नाही. जडेजा व धोनी यांच्या खेळीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. त्यांनी भारताला जवळपास विजय मिळवूनच दिला होता. वर्ल्ड कपमधील हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.”

तर दुसऱ्या बाजूला सामना संपल्यानंतर समालोचक संजय मांजरेकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाडेजाचं कौतुक केलं. मात्र हे कौतुक करत असतानाही मांजरेकरांनी आपला खोचकपणा दाखवला.