सामनातील जाहिरातीत ‘ठाकरें’च्या रांगेत मुख्यमंत्र्यांना स्थान

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या पहिल्या पानावरील जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या रांगेत मुख्यमंत्र्यांना स्थान देण्यात आले आहे .

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातीत मुख्यमंत्री दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पहिल्या रांगेत दिसत आहेत. शिवसेनेचे इतर मोठे नेते मात्र दुसऱ्या रांगेत आहेत.

या जाहिरातीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची मिलिंद नार्वेकर यांच्याशी असलेली जवळीक पुन्हा समोर आली आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना मात्र या जाहिरातीत दुय्यम स्थान दिल्याने शिवसैनिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.