शिवशक्ती-भीमशक्तीच्या ताकदीपुढे भिणारे भडकवतात जातीपातीची आग ; उद्धव ठाकरे

Uddhav-Thackeray-1

मुंबई : चेंबूर पांजरापोळ यथे छत्रपती शिवाजी महाराज चौक उभारण्यात आला असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या चौकात शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याभोवती शिवकालीन समूहशिल्प आणि प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. यापुढे शिवरायांना मुजरा करूनच मुंबईत पाऊल ठेवावे लागेल अशीच ही वास्तू असल्याचे प्रशंसोद्गार यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढले.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी माणसाची एकजूट आणि शिवशक्ती-भीमशक्तीच्या ताकदीपुढे आपण पालापाचोळ्याप्रमाणे उडून जाऊ अशी भीती वाटणाऱ्यांनीच सध्या जातीपातीची आग भडकावण्याचे उद्योग सुरू केले आहेत. अशा जातीय आगी भडकावून राजकीय पोळ्या भाजणाऱ्यांना त्याच आगीत भस्म केल्याशिवाय राहणार नाही. कोरेगाव भीमा हिंसाचारावरून राज्यात जातीयवाद चांगलाच वाढला आहे. तसेच जातीयवादी राजकारण पाहायला मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी हे बोलल्याचे समजते.Loading…
Loading...