आता दर तासाला पुण्यासाठी धावणार शिवशाही एसटी

shivshahi bus

सोलापूर – वातानुकूलित एसटी असलेल्या शिवशाहीला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने एसटी प्रशासनाने सोलापूर विभागाला आणखी सहा शिवशाही गाड्या मिळाल्या आहेत. आता सोलापूर विभागात १६ शिवशाही दाखल झाल्या आहेत. मंगळवारपासून नव्या सहा गाड्या धावण्यास सुरुवात करणार आहे. गाड्यांची संख्या वाढल्याने दिवसभरात सोलापूर ते पुणे मार्गावर शिवशाहीच्या ४४ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री ११ वाजेदरम्यान दर एक तासाला सोलापूर बसस्थानकावरून पुण्यासाठी शिवशाही धावणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

Loading...

मागील दोन महिन्यांपासून शिवशाहीला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. सोलापुरातून या गाडीचे भारमान ७० टक्के असल्याने शिवशाहीस प्रवाशांची चांगली पसंती असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय पुणे -सोलापूर -पुणे धावणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द असल्याने अनेक प्रवासी शिवशाही गाडीकडे वळले आहेत. सोलापूर -पुणे मार्गावर गाड्यांची पर्याप्त झाल्यानंतर अन्य मार्गावर देखील शिवशाही सोडली जाणार आहे. यात सोलापूर ते हैदराबाद सोलापूर ते नाशिक या मार्गाचा समावेश आहे. लवकरच या मार्गावर शिवशाही सुरू होणार असल्याने प्रवाशांची चांगली सोय होईल.

प्रतिसाद चांगलाशिवशाहीला सोलापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याने आणखी सहा गाड्या सोलापूर विभागाला मिळालेल्या आहेत. मंगळवारपासून त्या धावतील, असे सोलापूरचे विभागीय वाहतूक अधिकारी अश्वजित जानराव यांनी सांगितले.Loading…


Loading…

Loading...