Pune Accident | पुणे : पुणे (Pune) येथील शास्त्रीनगर (Shashtrinagar) मधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंगळवार रोजी सकाळी शहरातली शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही (Shivshahi Bus) बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या अगोदर सकाळी एका हॉटेलला आग लागली होती. त्यामुळे आज पुणे शहरात एक प्रकारचा आग्नी तांडवच सुरु असल्याचं समोर येतं आहे.
भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाहीये.
एम एच ०६ डी डब्ल्यू ०३१७ क्रमांकाची ही शिवशाही बस यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत होती. आज सकाळी येरवाडामधील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटल जवळ ही बस आली असता तिने अचानक पेट घेतला. शिवाजीनगर बस डेपोकडे ही बस जात असताना ही दुर्घटना घडली.
दरम्यान, यवतामाळहून निघाल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. मात्र तशा अवस्थेत ती पुण्याला आली आणि काही वेळानंतर पेट घेतला. यामध्ये बसचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Navneet Rana । “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची संपत्ती जपली नाही, ती संपत्ती शिंदेंसोबत आहे”; नवनीत राणांचा ठाकरेंना टोला
- Phone Bhoot | ‘फोन भूत’ चित्रपटातील कलाकारांचा बघा ‘हा’ अनोखा हॅलोविन लुक
- Kirit Somaiya । एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या माणसाला…”
- Gulabrao Patil | सुषमा अंधारे तिन महिन्यानंतर पक्षात आलेलं बाळ ; गुलाबराव पाटलांची टीका
- Rohit Pawar | “राजकीय नेते गप्प बसले तरी खरे HMV…” ; रोहित पवारांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार