शिवसेनेचा विश्वजीत कदमांना सक्रीय पाठींबा ; भाजपला आणखी एक दणका

मुंबई : माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार देणार नाही उद्धव ठाकरे यांचे विश्वजीत कदम यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर अस पत्रच शिवसेनेने काढले आहे. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वजीत कदम यांना आपला पांठिबा जाहीर केला होता. त्यामुळे भाजपने जरी कदमांविरोधात उमेदवार दिला असला तरी आता हि निवडणूक विश्वजित कदम यांना सोपी झाली आहे.

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेनेची इच्छा होती. पण भाजपाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत.

सहकार क्षेत्रात पतंगराव कदम यांची भूमिका पक्षीय राजकारणाच्या पलीकडची होती. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन, त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही विश्वजीत कदम यांना पाठिंबा देत आहोत, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

You might also like
Comments
Loading...