शिवसेनेने पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांच्या यादीतून ‘या’ मोठ्या नेत्याला वगळले

टीम महाराष्ट्र देशा :- विधानसभा निवडणुकीच्या दिवशी विविध प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी १८ जणांची निवड करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी पक्षाच्या वतीने बोलण्याऱ्या प्रवक्त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. मात्र, या यादीतून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना वगळण्यात आले आहे.

दरम्यान, पक्षाच्या भूमिकेविरोधात वेगवेगळी विधाने करणाऱ्या संजय राऊत यांना विधानसभा निवडणुकीत भूमिका मांडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या चर्चेचे वातावरण आहे.

या यादीत असलेल्या नेत्यांमध्ये अरविंद सावंत, नीलम गोर्हे, विशाषा राऊत, भावना गवळी, राहुल शेवाळे, धैर्याशील माने, अनिल परब, मनीषा कायंडे आणि सुनील शिंदे यांचा समावेश आहे.

या नेत्यांसोबतच सुरेश चव्हाण, सचिन अहिर, वरुण सरदेसाई, हेमराज शहा, साईनाथ दुर्ग, किशोर कान्हेरे, शितल म्हात्रे आणि शुभा राऊल हे पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम पाहतील. तसेच, एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांनाही माध्यमांशी बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

दरम्यान,पक्षाच्या मेडीया विभागाचे प्रमुख हर्षल प्रधान यांनी मीडियाला विनंती केली आहे की, त्यांनी या यादीत असलेल्या अधिकृत उमेदवारांकडूनच प्रतिक्रिया घ्याव्यात.

महत्वाच्या बातम्या