सेनेच्या विद्यमान खासदाराने केली सेनेच्याचं उमेदवाराविरुद्ध तक्रार दाखल

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र गायकवाड हे उस्मानाबादमधून शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, यंदा शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांच तिकीट कापलं आणि दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं. त्यामुळे रवींद्र गायकवाड नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी ओमराजे यांची एक क्लीप व्हायरल झाली होती. या क्लीपमध्ये ओमराजे यांनी अश्लील भाषा वापरून शिवीगाळ आणि चारित्र्य हनन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रवींद्र गायकवाड यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर आता गुन्हा नोंदवण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कलम ६५  , ६६ , ६७ आणि आयपीएसीच्या ५०० , ५०१ , ५०२, ५०४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात लढत होत आहे. अशातच रवींद्र गायकवाड विरुद्ध ओमराजे निंबाळकर या वादाचा फायदा रणाजगतीसिंह पाटील यांना होण्याची शक्यता आहे.