‘शिवसेनेचा खासदार बदला’; अशी राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट वृत्तपत्रात जाहिरात !

टीम महाराष्ट्र देशा : वृत्तपत्रांमधून सध्या नववर्षाच्या अनेक जाहिराती व शुभेच्छा पत्रके प्रसिद्ध होत आहेत.अशाच एका परभणीच्या वृत्तपत्रात राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अवहनात्मक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. चक्क या जाहिराती मधून जनतेला खासदार बदलण्याचे आवाहन केले असून शिवसेनेने आजपर्यंत केवळ जातीय तेढच निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.’खासदार बदला, जिल्हा बदलेल… वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची’ या शिर्षकाने ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेचा पराभव करता आलेला नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांन कडून यंदा ही जागा कुठल्याही परिस्थतीत जिंकायची असा आदेश आला आहे. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी वेगळी शक्कल लढवून जनतेला खासदार बदलण्याचे आवाहन केलं आहे.

You might also like
Comments
Loading...