fbpx

शिवसेनेचा मास्टर स्ट्रोक ! श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी

udhav thackeray shrinivas vanga and dev fadanvis

मुंबई: शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असून श्रीनिवास वनगा यांना उमेदवार घोषित करण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असून चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

पालघर पोटनिवडणुकीबाबत भाजप नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वनगा कुटुंबीयांना वळविण्यासाठी भाजपने युद्ध पातळीवर प्रयत्न केले. मात्र वानग कुटुंब भाजपसमोर झुकले नाही. ‘पालघर जिल्ह्यात भाजपाच्या वाढीसाठी चिंतामण वनगा यांनी ३५ वर्षे काम केलं. मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षानं आम्हाला वाऱ्यावर सोडलं,’ असं चिंतामण वनगा यांच्या पत्नी जयश्री यांनी शिवसेनेत प्रवेश करताना म्हटले होते.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत १० मे आहे. येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. गुरुवार ३ मे पासून यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.