शिवसेनेची वृत्ती गांढुळासारखी आहे – अजित पवार

पुढच्या वेळी यांना निवडून देऊ नका! आपण सत्ता आणू व सर्व प्रश्न सोडवू

कोल्हापूर: शिवसेनेची वृत्ती गांढुळासारखी आहे. या लोकांना खड्यासारखं बाजूला करायला हवं. राष्ट्रवादीचे नेते व माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल आंदोलना दरम्यान शिवसेनेवर हल्लाबोल चढवला. काल मुरुगुड येथे देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली होती.

अजित पवार म्हणाले, शिवसेनेची वृत्ती गांढुळासारखी आहे. या लोकांना खड्यासारखं बाजूला करायला हवं. तसेच नेसरी भागात हत्ती, रानडुक्कर यामुळे जनता त्रस्त आहे. मात्र हे सरकार उंदिरांसोबत खेळण्यात मग्न आहे. आपण प्रश्न लावून धरू. पुढच्या वेळी यांना निवडून देऊ नका. आपण सत्ता आणू व सर्व प्रश्न सोडवू. अॅट्रॉसिटीबाबत काल देशभर बंद पाळण्यात आला. त्यात नऊ जण मृत्यूमूखी पडले. हे का घडत आहे? सरकार यावर शांत का? सरकारमधील लोकच सरकारविरोधात बंड पुकारत आहेत. नाना पटोले, अशिष देशमुख ही त्याची उदाहरणे आहेत. असे पवार म्हणाले.

सरकारवर फटकारे ओढतांना अजित पवार म्हणाले, या सरकारने मोठ्या उद्योपतींना हजारो कोटींची मदत केली. शेतकऱ्यांना थोडीशी मदत केली असती तर राज्यासाठी बरं झालं असतं. शेतकऱ्यांनी कर्ज थकवले तर त्याचे साहित्य जप्त केले जाते मात्र कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं कर्ज २५ कोटीत सेटल करण्यात आलं. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वीज बिलं आकारली जात आहेत. हे शेतकरीविरोधी सरकार आहे. आम्ही सरकारमध्ये असताना ऊसाला भाव दिला, सबसिडी दिली हे सरकार असे निर्णय का घेऊ शकत नाही? यांच्या काळात २७ हजार बालकं मृत्यूमूखी पडली.

You might also like
Comments
Loading...