शेतकऱ्यांना तातडीने पिक कर्ज द्या ; शिवसेनेचा बँकांसमोर ठिय्या

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळपासून परभणी जिल्ह्यात बँकांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, कर्जमाफीची रक्कम विना अट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, ऑनलाईन सातबारा काढताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

त्यामुळे तलाठ्यांच्या हस्तलिखित सातबारा व होल्डींग पीक कर्जासाठी बँक प्रशासनाने स्वीकाराव्यात, या मागणीसाठी परभणी, पालम, मानवत, सोनपेठ, बोरी, येलदरी, गंगाखेड, सेलू या ठिकाणी शिवसैनिकांनी आज सकाळी ११ वाजेपासून खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली बँकांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आदोलकांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक व तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर केले.

You might also like
Comments
Loading...