fbpx

विधानसभेच्या १५३ मतदारसंघात शिवसैनिक हा भाजपला मत देणार नाही : प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर वंचित आघाडीने भविष्यवाणी केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगले दिवस येणार आहेत. तसेच विधानसभेच्या १५३ मतदारसंघात शिवसैनिक हा भाजपला मत देणार नाही, अशी भविष्यवाणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. बीबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी आंबेडकर म्हणाले की, भाजपने स्पष्टपणे सांगितलं आहे, की आम्ही शिवसेनेला विधानसभेच्या १३५ जागा देणार आहोत. म्हणजे उरल्या १५३ जागा. या १५३ मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं संघटन आहे, हे मी कबूल करतो. राज ठाकरे यांनी जर स्वतःला पुनर्स्थापित करायचं ठरवलं या १५३ मतदारसंघातला शिवसैनिक हा भाजपला मत देणार नाही. तर राज ठाकरेंना देईल. त्यामुळे राज ठाकरे निवडणुकीत उभे राहिले तर शिवसेनेची मतं त्यांच्याकडे वळतील. ही राज ठाकरेंसाठी सुवर्णसंधी आहे. एवढ्या वर्षांत त्यांना अशी संधी मिळालेली नाही. स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी त्यांना स्पेस आहे.

दरम्यान याआधी देखील प्रकाश आंबेकर यांनी मनसे बाबत भविष्यवाणी केली होती. मनसेला आगामी विधानसभा निवडणूक ही पक्ष बांधणीसाठी आणि पक्षाला उभारी आणण्यासाठी पोषक ठरणार आहे.