मोठी बातमी : विधानसभेपूर्वी शिवसेनेसाठी खुशखबर, विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय

blank

टीम महाराष्ट्र देशा: औरंगाबाद – जालना स्थानिक स्वराज्यसंस्थेतून झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अंबादास दानवे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दानवे यांनी कॉंग्रेस उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांचा पराभव केला आहे.

सर्वच पक्ष सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी झालेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. युतीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर कॉंग्रेस आघाडीने जेष्ठ नेते बाबुराव कुलकर्णीयांना मैदानात उतरवले आहे. मतदानापूर्वी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचं देखील पहायला मिळालं.

महायुतीचे अंबादास दानवे यांना ५२४ मतं, तर कॉंग्रेस आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मतं मिळाली. विशेष म्हणजे औरंगाबादमध्ये शिवसेना एमआयएममध्ये राजकीय संघर्ष पेटला असताना पक्षाच्या नगरसेवकांनी दानवे यांना मदत केल्याची चर्चा आहे.