मोठी बातमी : शिवसेना देणार आपल्या ५ ते १० आमदारांना डच्चू

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेची युतीची बोलणी सुरु असताना दुसरीकडे शिवसेना स्वबळावर २८८ जागांवर लढण्याची तयारी करत आहे. युतीचं चित्र स्पष्ट नसताना शिवसेनेने आपल्या 63 आमदारांपैकी साधारणत: 5 ते 10 आमदारांना संधी न देण्याचं ठरवलं आहे.

जे आमदार गेल्या पाच वर्षात ‘मातोश्री’साठी नॉटरिचेबल राहिले आहेत, लोकसभेच्या निवडणुकीत कमी पडले आहेत, ज्यांच्याविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत, जनतेची कामं केली नाहीत, अशा पाच ते दहा जणांना डच्चू देण्याचा विचार शिवसेनने केला आहे.

या आमदारांच्या जागी शिवसेनेने दुसरे उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. पक्षात फूट पडू नये म्हणून हे नॉन परफॉर्मर आमदार कोण आहेत याची माहिती उघड केलेली नाही. त्यांची नावं आताच बाहेर आली तर पक्षात मोठं बंड होण्याची शक्यता आहे. म्हणून शिवसेनाही सावध पवित्रा घेताना दिसत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोअर कमिटीने ही नावं काढली आहेत. तसंच इतर विद्यमान आमदारांना मात्र हिरवा कंदील दिला आहे.

महत्वाच्या बातम्या