fbpx

या राज्यात होणार शिवसेना भाजपचा आमना-सामना

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपची राज्यात युती आह्रे.  इतर बाकीच्या राज्यात शिवसेना आणि भाजप वेगळे-वेगळे लढणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये शिवसेना इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी शिवसेनेने १५ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. १५ पैकी ११ नावांची घोषणाही करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या जागांवर शिवसेनेचा विरोधी पक्ष हा भाजप राहणार आहे. बंगालमध्ये ममता बनर्जी यांचे सरकार आहे. मुख्य लढाई ही कॉंग्रेस, भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये होणार आहे. शिवसेनेचे या ठिकाणी उमेदवार असल्याने भाजपला तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला महत्व प्राप्त झालं आहे.

 

1 Comment

Click here to post a comment