आता भाजपसोबत राहायचं की नाही ते शिवसेनेनेचं ठरवावं – अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा/प्रशांत झावरे : देशात व राज्यात भाजपा हा सर्वात जास्त मोठा पक्ष आहे, त्यामुळे भाजपाबरोबर राहायचे की नाही हा निर्णय शिवसेनाच घेईल, ती त्यांची वैयक्तिक बाब आहे, शिवसेना व भाजपाची खूप जुनी मैत्री आहे, आम्हाला शिवसेनेला बरोबरच घ्याचे आहे, मात्र शिवसेना जर आमच्याबरोबर येणार नसेल तर तो निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत निवडणुकांना सामोरे जायला तयार आहोत आणि जिंकायला पण तयार आहोत असे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

येणारी लोकसभा निवडणूक आम्हाला शिवसेनेसोबत लढायला आवडेल, तसेच शिवसेनेनं आमच्यापासून लांब जाऊ नये यासाठीही आम्ही प्रयत्न करू असे म्हणून निर्णय सर्वस्वी शिवसेनेनेच घ्यायला पाहिजे असेही अमित शहा म्हणाले. देशात अनेक पक्ष भाजपाला विरोध करण्यास एकत्र आले आहेत, परंतु ते शेवटपर्यंत एकत्र राहणार नाहीत, यापूर्वीही अनेक पक्षांनी आम्हला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु विजय आमचाच झाला आहे हे सर्व देशाने पाहिले आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आला तर भाजपसमोर ते मोठं आव्हान असेल अशी कबूलीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान आंध्रप्रदेश, ओडिसा, केरळ, पश्चिम बंगाल, तमिळनाडू या राज्यांमध्ये भाजप जास्त जागा मिळवेल असंही अमित शहा यांनी स्पष्ट केले असून, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजपा स्पष्ट बहुमतातील सरकार स्थापन करेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...