fbpx

लोकसभा निवणूक : उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी शिवसेना साधणार शिवजयंतीचा मुहूर्त

तुळजापूर – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आठवडाभरावर येऊन ठेपलेली असतानाही शिवसेना पक्षाकडून अद्याप लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. या दिरंगाईमुळे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार सैरभैर झाले आहेत. पण तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर करेल अशी शक्यता आहे.

सध्या राज्यात चालू असलेल्या आयाराम गायाराम राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष परिपूर्ण दक्षता घेत आहेत. त्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात दिरंगाई करणे हा देखील एक दक्षतेचा भाग आहे. कारण उमेदवार जाहीर झाला की दुसरा इच्छुक उमेदवार विरोधकांच्या गोटात जावू नये यासाठी सर्वच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब लावत आहेत.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांमध्ये कधी नव्हे ते एवढी चुरस पहायला मिळत आहे. तसेच सर्वच इच्छुक दिग्गज असल्याने पक्षश्रेष्ठी उमेदवार यादी बाबतीत प्रचंड दक्षता घेत आहे. दरम्यान आता शुक्रवारनंतर शनीवार रविवार सुट्टी असल्याने उमेदवार अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी राहणार आहे. या पार्श्वभूमीवरचं इच्छुक उमेदवार मुंबईत तळ ठोकुन आहेत तर इकडे समर्थक सैरभर झाले आहेत.