१९९५ चा भाजप – शिवसेना युतीचा फॉर्म्युला आहे तरी काय ?

amit shaha vr udhav thakare

मुंबई: लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत. केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेसने अनेक पक्षांना एकत्र घेत महाआघाडीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे भाजप – शिवसेना युतीचे घोंगडे आणखीन भिजत पडले आहे. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांच्याशी युती संदर्भात बोलणी केल्याचं कळतय. यावर ठाकरे यांनी १९९५ च्या फॉर्म्युल्यानुसार जागा वाटप करण्यात याव, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, हा १९९५ सालचे युतीचे जागावाटप सध्य परिस्थितीमध्ये भाजपला मान्य होणारे नाही. त्यामुळे युतीवर आणखीन काही दिवस खलबते सुरूच राहणार

असल्याचं दिसत आहे. दरम्यान हा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे. हा फॉर्म्युला अमलात आणला गेला तरीच शिवसेना राज्यामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत असू शकणार आहे.

१९९५ साली विधानसभेसाठी शिवसेनेने 169 तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. निवडणुकीत दोन्ही पक्षांनी 138 जागा जिंकून राज्यात पहिले युतीचे सरकार स्थापन केले होते. मात्र २०१४ सालची परिस्थिती पाहता भाजप शिवसेनेची मागणी मान्य करेल हे दिसत नाही. कारण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्र निवडणू्क लढवत 122 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे राज्यात बळ असणारा भाजप 1995च्या सूत्रानुसार 116 जागा लढवणार का, हा मोठा प्रश्न आहे.