‘मिशन राम मंदिर’ : ‘अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….’

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज शनिवारी प्रभू रामचंद्रांच्या पवित्र अयोध्यानगरीत आगमन होत आहे. रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी अयोध्येत दाखल होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाविषयी संपूर्ण उत्तर प्रदेशात जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली असून ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी रामजन्मभूमी दुमदुमून गेली आहे.

दरम्यान,शिवसेनेच्या अयोध्या कार्यक्रमावर आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने टीका केली आहे. यासंदर्भात मुंबईतील शिवसेना भवन परिसरात मनसेकडून पोस्टरद्वारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अयोध्येला निघालो जोशात…राजीनामे मात्र अजूनही खिशात….अशा आशयाचे पोस्टर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिवाजी पार्क येथील मुख्यालयाच्या समोरचा लावली आहेत. शिवसेना-मनसेकडून अधूनमधून एकमेकांविरोधात राजकीय फटकेबाजी होत असते. अशा प्रकारे यापूर्वीही मनसेने शिवसेनेवर टीकात्मक पोस्टरबाजी केली आहे.

मनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली

उद्धव ठाकरेंचा आयोध्या दौरा : खा. संजय राऊत यांनी राम मंदिर परिसराला दिली भेट