मोठ्या राजकिय पक्षाकडून नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा सोमय्यांचा आरोप 

निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात घोडेबाजार रोखण्याची केली विनंती

टीम महाराष्ट्र देशा :वेगवेगळया कारणांमुळे नेहमी चर्चेत असणारे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या नव्या आरोपामुळे मोठा वाद होण्याची  शक्यता निर्माण झाली आहे . सोमय्या यांनी बीएमसीत मोठ्या राजकिय पक्षाकडून नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.सोमय्या यांनी आज एक ट्विट केलं आहे ज्यात त्यांनी हे आरोप केले आहेत .

नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भांडुपमध्ये विजय संपादित केल्यामुळे शिवसेनेच्या बहुमताच्या आकड्याच्या अगदी जवळ भाजप पोहचले आहे. त्यातच काल दिवसभर महानगरपालिकेत सत्तांतर होणार का हि चर्चा दिवसभर सुरु होती.या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी केलेल्या ट्विट मुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत .या  ट्विटमध्ये सोमय्या यांनी थेट शिवसेनेचे नाव घेतले नसले तरी बीएमसीत मोठ्या राजकिय पक्षाकडून नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे.निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रात घोडेबाजार रोखण्याची विनंती सोमय्या यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...