असदुद्दीन ओवेसींच्या ‘या’ भाकितामुळे राजकारणात खळबळ

असदुद्दीन ओवेसींच्या ‘या’ भाकितामुळे राजकारणात खळबळ

Asaduddin Owaisi - Uddhav Thackeray

सोलापूर: एआयएमआयएमचे (AIMIM) पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी सोलापूरात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकांवर हल्ला चढवताना शिवसेनेच्या २०२४ च्या राजकीय भविष्यावर खळबळजनक वक्तव्य केले आहे. ओवेसींचा पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आणि पत्रकारपरिषदेतही बोलण्याचा रोख हा शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर होता.

धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखांना लक्ष्य केलं. धर्मनिरपेक्षता ही काय खायची गोष्ट आहे का, असा सवाल करत शिवसेनेसोबत गेल्यामुळं दोन्ही काँग्रेस आता उघड्या पडल्या आहेत, अशी टीका देखील असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह आहे. परस्पर विरोधी विचारधारेचे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच कडाडून टीका केली आहे. त्याच सोबत त्यांनी शिवसेने बद्दल सूचक भवितव्य केले आहे. असदुद्दीन ओवेसींच्या मतानुसार शिवसेना पुन्हा भाजप सोबत जाईल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी केलेल्या या भाकितामुळे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या: