गोव्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना स्वबळावर लढवणार

पणजी : गोव्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना लढवणार असल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यादृष्टीने आता पावलं टाकण्यास शिवसेनेनं सुरुवात केली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा लढवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहितीही संजय राऊतांनी दिली.