खिशातले राजीनामे बाहेर येणार, शिवसेना लवकरच सत्तेतून बाहेर पडणार ?

टीम महाराष्ट्र देशा : सत्तास्थापनेपासून भाजपला विरोध करणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना मंत्री राजीनामा देण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे.

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आधी अयोध्या आणि नंतर पंढरपूरमध्ये जंगी सभा घेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपच्या धोरणांना सर्वजण वैतागले असून, शिवसेना मंत्र्यांच्या खिशातले राजीनामे केव्हाही बाहेर पडू शकतात, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होत.

दरम्यान, टोकाची विरोधकरूनही शिवसेना सत्तेतुन का बाहेर पडत नाही अशी टीका विरोधकांकडून कायम करण्यात येते. मात्र आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसनेचे मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...