Share

Eknath Shinde | “एकनाथ शिंदे मान खाली करुन भाजप…”, शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना पक्षाच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. यावरुन शिवसेनेच्या शिल्पा बोडखे यांनी शिंदेंवर घणाघात केला आहे.

शिवसेना पक्षाचा एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर टीका :

शिल्पा बोडखे यांनी एक ट्विट केलं असून त्यामधूनच त्यांनी शिंदेंवर घणाघात केला आहे. एकनाथ शिंदे मान खाली करून भाजपा ने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचत राहिले आणि लोक उठून निघून गेली, असं त्यांनी त्यांच्या ट्विमध्ये लिहिलं आहे.

शिवसेना पक्षाच्या शिल्पा बोडखे यांचं ट्विट :

एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

काय म्हणाले शिंदे ?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक टीकेला उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली म्हणता . अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण?”

तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली-

“खरे गद्दार कोण? कोणी केली गद्दारी ?आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. खऱ्या अर्थाने तुम्ही साहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं. आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेना पक्षाच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा झाली. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now