सातारा पोटनिवडणूक : उदयनराजेंच्या उमेदवारीविषयी शिवसेनेनी घेतली ‘ही’ भूमिका

टीम महाराष्ट्र देशा : निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि हरियानामधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या निवडणुकांसह देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती.

मात्र आता निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतचं होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे. उदयन राजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे ही जागा त्यांनी आता भाजपला सोडली आहे. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी भाष्य केले आहे. राउत यांनी ‘सातारा लोकसभेच्या विद्यमान खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ताणतणाव कशा करता करायचा. नंतर पाहूया. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत परत जागांचं वाटप होईल. मग साताऱ्याच्या बदल्यात काय घेता येईल ते पाहू अस विधान केले आहे.

तसेच पुढे बोलताना ‘आधी उदयनराजे भोसले यांना निवडणूक लढवूद्यात. त्यांना जिंकून येऊद्यात. त्यानंतरचा निकाल आहे तो. सध्या निवडणुक तर होऊद्यात. ‘ही युती आहे, युतीमध्ये काय भूमिका असणार अस विधान करत भाजपला पाठींबा जाहीर केला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांचा सामना शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांच्याविरुद्ध झाला होता.

महत्वाच्या बातम्या