fbpx

लाज वाटते या सरकारची – उद्धव ठाकरे

कन्नड: कर्जमाफीची वाट पाहत शेतकरी रांगेतच उभा आहे आणि सरकारकडून मी लाभार्थीची जाहिरात केली जाते, मग तुम्ही लाभार्थी नाहीत म्हणजे देशद्रोही! लाज वाटते या सरकारची म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. शिवरायांच्या नावाने असलेल्या कर्जमाफीच्या योजनेला काळिमा फासू देणार नाही. तसेच शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे . कन्नड येथे ‘रायभानजी जाधव: व्यक्ती आणि विचार’ या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि ‘सध्या राज्यात सरकार सिंचनाची जुनीच कामे पुढे रेटत आहे. एकही नवीन योजना नाही. मात्र जुन्या योजनांची बिले फुगवली जात आहेत. निवडणुकी आधी सिंचनाच्या घोटाळ्याचे पुरावे देणार असल्याच सांगितल जात होत कुठे गेले ते पुरावे’.