fbpx

साध्वी प्रज्ञासिंगची व्यथा समजून घ्या, शिवसेनेकडून प्रज्ञाची पाठराखण

sanjay-raut

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वादात सापडलेली मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर टीकेची धनी बनली आहे. साध्वीवर चौफेर टीका होत असताना शिवसेनेकडून समर्थन होत आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, ज्याप्रकारे एका महिलेला यातना देण्यात आल्या, तिची प्रतारणा करण्यात आली… ते कोणत्याही कायद्यात बसत नाही. साध्वीची भावना-पीडा तुम्ही समजून घ्यायला हवी… ठिक आहे, २६/११ च्या हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले पण त्यांचं नाव नेहमीच मालेगाव बॉम्बस्फोटाच्या चौकशीत चर्चेत राहिलं… परंतु, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहीत यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्याची किंमत चुकवावी लागली अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.तसेच केंदीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील साध्वीच्या समर्थनात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, व्यक्तीगत त्रास झाल्यामुळं प्रज्ञासिंग यांनी असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान एटीएस अधिकारी हेमंत करकरे यांना माझाच शाप भोवला आहे. तुझा सर्वनाश होईल असे मी हेमंत करकरे यांना म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसातचं हेमंत करकरे हे २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. अशा प्रकारच वादग्रस्त वक्तव्य साध्वीने केलं होत. या वक्तव्या नंतर राजकीय आणि सामाजिक स्तरातून साध्वी यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात होता. मात्र परखड भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेने साध्वीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.