मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंकजा मुंडेंनी पुरुषांचे प्रबोधन करावे – नीलम गोऱ्हे

टीम महाराष्ट्र देशा : कुटुंबाच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केल्याच्या रागातून भावाने भर रस्त्यात बहिणीवर आणि तिच्या पतीवर हल्ला केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. या हल्यात बहीण गंभीर जखमी झाली असून पतीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसेना प्रवक्त्या आ निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

बीडमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीला लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि बीड एसपीची भेट घेणार आहे. अशा घटना घडल्यावर आपण पोलिसांना दोष देतो. मात्र त्यामागे राजकीय हस्तक्षेप असतो, परंतु पोलिसांनी निपक्षपात पणे काम करावं असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पुरुषांचे प्रबोधन करावे

बीडमध्ये एखादी घटना घडल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे या संबंधीत पीडित कुटुंबाची भेटी घेतात. परंतु त्यांनी मुलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरुषांमध्ये प्रबोधन करायला हवं. शिक्षक विदयार्थीनीची छेड काढतायत तर एकतर्फी प्रेमातून मुलींची हत्या करण्यासारखे प्रकार देखील बीडमध्ये घडल्या असल्याचं गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

2 Comments

Click here to post a comment
Loading...