पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी

टीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अखेर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपचा झेंडा त्यांच्या हाती देत भाजप प्रवेश दिला आहे. दरम्यान,या प्रवेशानंतर भाऊबंदकी पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला आणखीन बळ मिळाले आहे. तर राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात असताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबई येथे शरद पवारांची भेट घेतली.आता याच मुद्द्यावरून पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ऊदधव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.