Karnataka Election; राज्यपाल न्यायदेवतेच्या तत्वाला जागले नाहीत – उद्धव ठाकरे  

बंगळुरू : कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.दरम्यान भाजपकडे बहुमत नसताना देखील राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलवल्याने विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत असतानाच, आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील राज्यपालांच्या या निर्णयाचा समाचार घेतलाय.

कर्नाटकात भाजपचे येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाले, यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. कायदा, घटनेनुसार नाही तर राजकीय नियमानुसारच हे घडले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात मंत्रिमंडळात राज्यपाल वजुभाईंनी १४ वर्षे काम केले आहे व मोदी यांच्या कृपेनेच ते कर्नाटकच्या राज्यपालपदी बसले आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले हे बरोबर आहे. कारण आमच्या न्यायपालिकांपासून राज्यपालांपर्यंत कोणीच आंधळ्या न्यायदेवतेच्या तत्त्वास जागत नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सामनातून त्यांच्यावर टीका केली  आली आहे.

Gadgil