भाजप तर जागा देईलचं, शिवसेनेनेही आरपीआयला जागा सोडाव्यात : महातेकर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजप-सेना महायुतीत सामिल असणाऱ्या आरपीआयचे नेते आणि राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी शिवसेनेनेही आरपीआयला जागा सोडाव्या अशी मागणी केली आहे.

Loading...

औरंगाबादमध्ये बोलताना महातेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आरपीआयला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेलाही आमचा फायदा झालाच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातूनही आम्हाला जागा मिळायला पाहिजे अस महातेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचा काय परिणाम राहील, असा प्रश्न विचारता महातेकर यांनी लोकसभा निवडणुकीत झाला तसाच परिणाम होईल अस उत्तर दिले.Loading…


Loading…

Loading...