fbpx

‘शिवसेनेला सत्तेतून कीक मारून बाहेर काढावं लागेल’

udhhav thakrey and narayan rane

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नसते, त्यांना कीक मारूनच सत्तेतून बाहेर काढावं लागेल अशी बोचरी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. तसेच शिवसेनेला डिवचण्यासाठी निवडलं असेल तर जोरात डिवचलं गेलं पाहिजे.शिवसेनेसारख्या पक्षाला याचा काहीही फरक पडत नाही असंही यावेळी राणे म्हणाले.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. यापुढे जाऊन त्यांनी जर का महाराष्ट्रात भाजप शिवसेनेची युती झाली तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लढेल असा पुनरुच्चार या मुलाखतीत केला आहे.त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीवर चाललेल्या संघर्षात राणेंची भूमिकाही तितकीच महत्वाची आहे.राणे या भूमिकेवर किती ठाम राहतात हेही बघणे महत्वाचे आहे.