सातारचे खासदार फक्त ‘स्टाईल’ मारण्यात पटाईत – नरेंद्र पाटील

सातारा: सतारचे विद्यमान खासदार हे केवळ स्टाईल मारण्यात पटाईत आहेत. मात्र स्टाईलं मारून बेरोजगारी सुटू शकतं नाही. म्हणत सातारा लोकसभा शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी खा उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खा उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. उदयनराजे आणि पाटील यांच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसत आहे. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उदयनराजेंवर टीका केली आहे.

साताऱ्यामध्ये असणाऱ्या दहशतीमुळे येथे उद्योगधंदे आले नाहीत, शहरात वाद कशामुळे होतात, हे राज्याला माहित आहे. पुणे , कोल्हापूरात उद्योगक्षेत्र वाढले असताना सातारामध्ये मात्र औद्योगिक क्षेत्र वाढले नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच टोलनाक्याची ‘रसद’ बंद करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.