संजय राऊत यांचा एसटी कामगारांना सल्ला; तुम्ही शहानपणाणे आपल्या….

संजय राऊत यांचा एसटी कामगारांना सल्ला; तुम्ही शहानपणाणे आपल्या….

Sanjay Raut

मुंबई: गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एसटी कामगारांना पगारवाढ करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र तरीही एसटी कामगार आंदोलन सुरूच ठेवत आहेत. एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा दिली.

पगारवाढ केल्यानंतरही एसटी कामगार आपल्या संपावर ठाम असल्याने हे आंदोलन पुन्हा गुंतागुंतीचे होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट शब्दात एसटी कामगारांना सल्ला दिला आहे. आपल्या कुटुंबाचा विचार करा, असा सल्ला संजय राऊत यांनी एसटी कामगारांना दिला आहे. एसटी कामगारांच्या या संपामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने हे आंदोलन लवकरात लवकर संपावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

विलिनीकरणाचा विषय न्यायालयात आहे. पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं हित आहे. जे वकील त्यांना भडकवत आहेत ते त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था काय झाली हे पाहिलं होतं. एसटी कामगारदेखील मराठा बांधव आहेत. त्यांनी शहाणपणाने आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या: