शेकापच्या गडाला शिवसेनेन लावला सुरुंग, सांगोल्यातून शहाजी बापु पाटील विजयी

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीचे बहुतांश निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यामध्ये एकदा महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, भाजप – शिवसेनेला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही. तर दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादीचा समाधानकारक जागांवर विजय मिळाला आहे. शेकापचा गड असणाऱ्या सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजी बापु पाटील यांनी शेकापचे अनिकेत देशमुख यांचा पराभव केला आहे.

गेली पाच दशके सांगोला मतदारसंघात शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा दबदबा कायम राहिला होता. यंदा देशमुख यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांना शेकापकडून उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेनेकडून शहाजी बापु पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

Loading...

सुरुवातीपासुन सांगोल्यामध्ये चुरस पहायला मिळाली. शेकापचा गड भेदण्यासाठी शिवसेनेन जोरदार लढत दिली. अखेर सांगोलेकरांनी घराणेशाहीला लाथाडत शहाजी पाटील यांच्या बाजूने कौल दिला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील विजयी उमेदवार

माळशिरस : राम सातपुते – भाजप
अक्कलकोट: सचिन कल्याणशेट्टी – भाजप
दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुख – भाजप
सोलापूर शहर उत्तर: विजयकुमार देशमुख – भाजप
सोलापूर शहर मध्य : प्रणिती शिंदे – कॉंग्रेस
मोहोळ : यशवंत माने – राष्ट्रवादी कॉंग्रेस
पंढरपूर : भारत भालके – राष्ट्रवादी कॉंग्रेस
सांगोला : शहाजी बापु देशमुख – शिवसेना
करमाळा : संजयमामा शिंदे – अपक्ष
बार्शी : राजेंद्र राऊत – अपक्ष

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?