मुंबई : काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागील कारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होतं. अशातच आता शिवसेना (Shivsena) पक्षाने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षावर टीका करणारे शिंदे काँग्रेस पक्षात जाणार होते, असा खुलासा शिवसेना पक्षाने केला आहे.
शिवसेना पक्षाचा मोठा गौप्यस्फोट :
काँग्रेस (Congress) राष्ट्रवादी (NCP) वर शिंदे आज टीका करत आहेत, मात्र महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेस दिवंगत नेते अहमद पटेल (Ahmed patel) यांच्याशी संधान बांधले होते, त्यावेळी देखील त्यांच्या मनात वेगळे विचार होते, मात्र सौदेबाजी फिस्कटली इतकंच असं पुरावांसह सांगणारे अनेक लोक आजही त्यांच्या अवतीभवती आहेत, एवढेच नाही तर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील गौप्यस्फोट केला आहे, तेव्हा शिंदेंनी काँग्रेस बरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेस बरोबर गेल्याने ठाकरे-दिघे यांच्या हिंदुत्ववादीच्या विचारांचा वारसा मोडून पडेल असं त्यांना वाटलं नव्हतं, त्याच काळात त्यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधले आणि पंधरा ते वीस आमदारांसोबत येतो गृहमंत्री पदासोबत उपमुख्यमंत्री पद द्या ही चर्चा त्यांनी सुरू केली होती, असं ठामपणे सांगणारे आहेत त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत, असा खुलासा शिवसेनेने केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा :
दरम्यान, शिंदे काँग्रेस सोबत चर्चा करत असल्याची खबर तेव्हा भाजपने उद्धव ठाकरे यांना दिली होती, असे देखील शिवसेनेने म्हटलं आहे. ईडीच्या भितीने शिंदे हे भाजपमध्ये गेले कारण ठाणे महानगरपालिका, समृद्धी महामार्ग, नगर विकास खाते या माध्यमातून पैसाच पैसा आणि त्या पैशातून सत्ता, सत्तेतून पुन्हा पैसा या दृष्टचक्रात एकनाथ शिंदे पूर्णपणे अडकले होते, नाही तर शिंदे आज मी काम का आदमी था असे उघड बोललं जातं, मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा असणं वेगळ व लालसा असणं वेगळं, शिंदे हे लालसेचे बळी ठरली असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
दरम्यान, शिवसेना मेळावा वरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेलं दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा एकनाथ शिंदेंवर हल्ला
- Government Job Alert | स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या 990 रिक्त पदांसाठी भरती प्रकिया सुरू
- Nitesh Rane | “आता देवी सरस्वती सुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही”, नितेश राणेंचा छगन भुजबळांवर घणाघात
- Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील पालकमंत्री होताच अजित पवारांना धक्का, ‘इतक्या’ कोटींच्या कामांमध्ये फेरबदल होण्याचे दिले संकेत
- New Rule | सरकारी कार्यालयात फोनवर ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं लागणार’, जाणून घ्या नियम