शिवसेनेत आज मोठे फेरबदल ; आदित्य ठाकरे नेते तर मनोहर जोशींची नेतेपदावरून गच्छंती ?

टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक होतेय. मुंबईत वरळी मधील नॅशनल स्पोर्टस कॉम्पलॅक्समध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत निवडणूकी साठी मतदान होत आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे नेतेपद जाणार असल्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नेते पदासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.

तर दुसरीकडे शिवसेना पक्ष प्रमुख आणि युवासेना प्रमुख पदांची बिनविरोध निवड होणार आहे. शिवसेनेतील जेष्ठ मंत्री आणि खासदार अनंत गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, तर जेष्ठ आमदारांपैकी गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, संजय राठोड यांच्याही नावाची चर्चा आहे. तसंच शिवसेनेच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणारे सुधीर जोशी आणि मनोहर जोशी यांना नेता पदावरून शिवसेना पक्ष संघटन मार्गदर्शक पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. या सर्व नावांपैकी अधिकृत कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची नावं स्वत: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणात जाहीर करणार आहेत.