तुम्ही अंथरून सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत; राज ठाकरेंवर शिवसेनेचा पलटवार

shivsena rply on raj tahckeray cartoon

२०१९ मध्ये विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. सेनेच्या याच निर्णयावर मार्मिक फटकारे मारत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्यंगचित्र फेसबुक पेजवर प्रसिद्ध केले होते. दरम्यान हे व्यंगचित्र सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाले असून शिवसेनेला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील चांगलेच झोंबल्याच दिसत आहे.

राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत शिवसैनिकांकडून राज यांच्यावर उपरोधिक टीका करणारे व्यंगचित्र सोशल मिडीयावर टाकण्यात आल आहे. यामध्ये मनसेमधून सुरु असणाऱ्या ‘आउटगोईग’चा धागा पकडत राज यांच्यावर टीका करण्यात आली आहेshivsena rply on raj tahckeray cartoonशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वेळा शिवसेनेने भाजपला सत्तेतून बाहेर पडण्याची पोकळ धमकी दिलीय. उद्धव यांच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यंग्यचित्र काढत उद्धव ठाकरेंना चांगलेच फटकारे होते. आपल्या फेसबूक अकाऊंटवर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेच्या निर्णयाची खिल्ली उडवणारं व्यंगचित्र टाकलं होत, ज्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.

Loading...