जिगरबाज शिवसैनिक : थेट कर्नाटकात जाऊन उचलली महाराष्ट्रद्वेषी भीमाशंकर पाटलाची तिरडी !

shivsena

टीम महाराष्ट्र देशा : भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले.

मराठी भाषिकांनी कर्नाटकाच्या स्वाभिमानाला धक्का सतत पोचविला आहे. त्यांना गोळ्या घाला, असे म्हणण्याचे धाडस दाखवा. मराठी भाषिकांना सीमेवर उभे करून तेथे गोळ्या घाला. त्याला आमचा पाठिंबा असेल. त्याचे काय परिणाम होतील, ते होऊ दे. सीमाप्रश्न एकदा संपविला जावा.” अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

मात्र, आज कोल्हापूर येथील जिगरबाज शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.  शिवसैनिकांनी थेट महाराष्ट्र कर्नाटक महामार्गावर भीमाशंकर पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची तिरडी काढून दहन करत निषेध नोंदवला. तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांना आपला पाठींबा असल्याचे यावेळी सांगितले.

दरम्यान, भीमाशंकर पाटील यांच्या आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी पाटील यांचा समाचार घेतला. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा धैर्यशील माने यांनी दिला आहे.