कचरा समस्येकडे महापालिकेचे दुर्लक्ष; शिवसैनिकांनी क्षेत्रीय कार्यालयात फेकला कचरा

पुणे: महापालिका अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रार करूनही जनता वसाहतमधील कचरा प्रश्न सुटत नसल्याने आज शिवसैनिकांनी सिंहगड  रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये कचरा टाकत आंदोलन केले आहे. पर्वती विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांच्या नेतृत्वात हे कचरा फेको आंदोलन करण्यात आले. यावेळी निवेदन घेण्यासाठी पालिका अधिकारी न आल्याने संतप्त आंदोलकांनी ‘अधिकारी हरवल्याचे’ पत्रक क्षेत्रीय कार्यालयावर लावले.

जनता वसाहत भागामध्ये अनेक ठिकाणी छोट्या कचरा खाणी आहेत, पावसाळा सुरु झाल्यावर या खाणींमध्ये पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेक वेळा दुषित पाणी पुरवठा देखील होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जनता वसाहतीत कचरा समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे रहिवाशांच्या आयोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लेखी तक्रार देवूनही क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्याने आंदोलन करावं लागल्याचं यावेळी पर्वती विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी सांगितले.

जियो इन्स्टिट्यूट शोधा आणि ११ लाख पैसे मिळवा, मनविसेची बंपर ऑफर