पीकविम्यासाठी शिवसेनेचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा

blank

सोलापूर – पीकविमा मिळावा यासाठी शिवसेनेच्यावतीने राज्यभरात रान पेटविण्याचे काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तुरीचा पीकविमा मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

करमाळा तालुक्यातील सालसे सर्कलमधील २५७० शेतकऱ्यांनी तूर या पिकाचा विमा भरला होता. तुरीचे पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे गरजेचे होते. मात्र, कंपनीकडून शेतकऱ्यांना विमा दिला नाही. शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख रुपये पिकविमा रक्कम मिळावी म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १५ दिवसांपासून शिवसेनेने आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान,५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिले. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी तहसील कार्यालयात येऊन मोर्चाला पाठींबा दिला.