मराठा आरक्षण : शिवसेना आमदारांचे विधानभवनात लाक्षणिक उपोषण

shivsena and maratha kranti morcha

नागपूर : मराठा आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या 4 आमदारांनी आज, मंगळवारी लाक्षणिक उपोषण केले. “फुटबॉल नको आरक्षण द्या” अशा घोषणा देतया आमदारांनी मराठा आरक्षण तत्काळ लागू करण्याची मागणी केली.

विधीमंडळाच्या कामकाजाला प्रारंभ होण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजेच्या सुमाराला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, सुजीत मिणचेकर, चंद्रदीप नरके आणि उल्हास पाटील यांनी विधानभवनाच्या पाय-यांवर बसून लाक्षणिक उपोषण सुरू केले. यावेळी शिवसेनेच्या इतर सदस्यांनीही त्यांना साथ दिली.

याबाबत माहिती देताना आ. क्षीरसागर यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासशासनाकडून विलंब होत असल्यामुळे लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

न्यायालयाकडे बोट दाखवून मराठा आरक्षण लागू करण्यास वेळ लावणे अयोग्य आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची इच्छा असल्यास याप्रकरणी हमखास मार्ग निघू शकतो. तामिळनाडूमध्ये आरक्षणाचीमर्यादा 69 टक्के आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत देण्यात आले आहे. हाच निकष लावून महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले.