‘मुंढे काका आमची बस द्या हो,’ विद्यार्थ्यांची हाक

 

पुणे: पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पुणे महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता अचानक केलेल्या शालेय बस दरवाढी विरोधात शहरातील राजकीय पक्ष आणि विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याच दिसून येत आहे

आज शालेय पास दरवाढीच्या विरोधात शिवसेनेकडून अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसह महापालिका सभागृहाबाहेर आंदोलन करण्यात आल आहे.  यावेळी विद्यार्थ्यांनी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना गुलाब देत बस पास सवलतीच्या दरात उपलब्द करून देण्याची मागणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी हक्काच्या पाससाठी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण महापालिका परिसर दणाणून गेल्याच पाहायला मिळाल.

लवकरच चर्चाकरून पासच्या तिढा सोडवणार 
आक्रमक विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सर्व पक्षांच्या गटनेत्यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी चर्चाकरत पासची दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. यावेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपीएल प्रशासनाशी चर्चाकरून पासच्या तिढा सोडवणार असल्याचं सांगितल आहे.